पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची मटका जुगाराविरुद्ध कारवाई – दोन आरोपी जेरबंद, ₹24,310/- किमतीचा मुद्देमाल जप्त.

SHARE:

लातूर शहर व जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाकडून सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने दिनांक 01 एप्रिल 2026 रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगाराविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाईदरम्यान बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार जुना रेणापूर नाका परिसरात काही इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारून कल्याण मटक्याच्या आकड्यावर जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती विशेष पथकास प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीची पडताळणी करून विशेष पथकातील अधिकारी व अमलदारांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून दुपारी 15.45 वाजता नमूद ठिकाणी अचानक छापा टाकला. छाप्यामध्ये दोन इसम मटक्याचे आकडे लिहून घेताना व पैसे स्वीकारताना आढळून आले. त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस करण्यात आली असता त्यांनी आपली नावे

1) नागेश गोराखनाथ कोळेकर (वय 24 वर्षे, रा. व्यंकटेश नगर, लातूर)

2) वसीम निजाम शेख (वय 32 वर्षे, रा. व्यंकटेश नगर, लातूर)

असे असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेण्यात आली असता आरोपींकडून मटका जुगारासाठी वापरण्यात येणाऱ्या आकड्यांच्या चिठ्ठ्या, रोख रक्कम तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण ₹24,310/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाईदरम्यान आरोपींकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी हा मटका जुगार परवेज शेख (रा. इंडिया नगर, लातूर) याचे सांगण्यावरून चालवत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार संबंधित बुकी मालकाविरुद्धही कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, 1887 अंतर्गत कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून, या पथकामध्ये पोउपनि आयुब शेख, श्रेणी पोउपनि उत्तम जाधव, रामहरी भोसले, विशाल गुंडरे, यशवंत घुगे, चामे पोलीस अधिकारी व अमलदार यांचा सक्रिय सहभाग होता.

Leave a Comment

Follow Us Now