मान्सूनपूर्व नाले सफाई व अतिक्रमणासंदर्भात बैठक

SHARE:

लातूर/ प्रतिनिधी: मान्सून पूर्व नालेसफाई आणि शहराच्या चारही बाजूंनी जाणाऱ्या रिंग रोडवरील अतिक्रमणे या संदर्भात महापौर जयश्री सोनकांबळे व मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

  उपमहापौर स्नेहल उटगेअतिरिक्त आयुक्त देविदास जाधव,उपायुक्त वसुधा फड,वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अमोल लांडगे यांचीही या बैठकीस उपस्थिती होती.

 आगामी पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून मान्सूनपूर्व नाले सफाईचा आराखडा तयार करावा अशा सूचना या बैठकीत संबंधित विभागांना देण्यात आल्या. प्रत्येक प्रभागात हमला पद्धतीने नालेसफाई करावी. यासाठी महानगरपालिकेत आपत्कालीन कक्षाची स्थापना करावी. शहरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरणार नाहीयाची दक्षता घ्यावी. धोकादायक झाडे व फांद्या तोडाव्यात.मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींच्या ठिकाणी सूचना फलक लावावेत.रस्ते दुभाजकातील कचरा उचलून ते स्वच्छ करावेतअशा सूचना यावेळी करण्यात आल्या.  स्वच्छता विभाग व बांधकाम विभागाने मान्सूनपूर्व नाले सफाईची कामे त्वरित सुरू करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

  शहराच्या बाहेरून जाणाऱ्या रिंग रोडवर अतिक्रमणे होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगाने अतिक्रमणे झाली आहेत की नाहीयाचे सर्वेक्षण करून  दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले.

 यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेखस्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगेक्षेत्रीय अधिकारी रवी कांबळेसंतोष लाडलापुरेसमाधान सूर्यवंशीविजय राजुरेमुख्य स्वच्छता निरीक्षक रवी कांबळेधोंडीबा सोनवणेशिवराज शिंदे,अक्रम शेख यांच्यासह सर्व १८ प्रभागांचे स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now