भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या नगरसेविकांच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद

SHARE:

लातूर दि३०- महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असताना पालिकेच्या बजेटचा अभ्यास करून विकास कामाची मागणी पाहिजे असे मत ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी व्यक्त केले.
भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या वतीने  लातूर शाखेच्या वतीने   नवनिर्वाचित नगरसेविका साठी  कार्यशाळा आयोजित  केली होती .  १९ नगरसेविका या कार्य शाळेला उपस्थित होत्या . मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन  करण्यात आले.
यावेळी डॉ अर्चना आपटे यांचे  “हमको मन की शक्ती देना ”  प्रेरणा गीत म्हटले . मान्यवराचे स्वागत संघटनेच्या शहर अध्यक्ष प्रेमा बाहेती आणिसचिव संजीवनी सबनीस यांनी केले.भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीयअध्यक्ष्य  कुमुदिनी भार्गव यांनी प्रास्ताविक करून संघटनेची माहिती देऊन  कार्यशाळा आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली.यशस्वी नगरसेवक होण्या साठी घरच्या जबाबदाऱ्या आणि नगरसेवक म्हणून करायची कामे, लोकाच्या अपेक्षा पुर्ण करताना महिलाना नियोजन करणे आवश्यक असल्याचे भार्गव यांनी नमूद केले.
अशोक गोविंदपूरकर यांनी लातूर नगर पालिकेचा इतिहास, आरक्षण नसतानाही केशरबाई भार्गव सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरसेवक म्हणून केलेल्या कामाची माहिती करून दिली. पक्षाच काम म्हणजे नगरसेवक पद नाही असे सांगत  नागरसेविकांच्या जबाबदाऱ्या काय असतात ,आणि बजेट विषय अत्यंत सखोलपणे मांडला . माजी नगरसेवक
ऍड . स्मिताताई परचुरे यांनी त्या नगरसेविका असतानाचे कांहीं अनुभव आणि पक्ष निरपेक्ष कार्य किती महत्वाचे ते सांगितले .
जेष्ठ पत्रकार अरूण समुद्रे यांनी संवाद आणि आणि संपर्क  ही शक्तीस्थळे असल्याचे सांगितले.या कार्यक्रमात लातूर शाखेने प्रत्येक नगरसेविकेला स्मृतिचिन्हाने सन्मानित केले . प्रातिनिधिक स्वरूपात प्रेरणा होनराव आणि स्वाती घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले डॉ सुरेखा  काळे यांनी आभार व्यक्त केले. कार्यशाळेचे सूत्रसंचलन अनघा अंधोरीकर यांनी केले .

Leave a Comment

Follow Us Now