अकराव्या  दिवशी आणखी (135) गुन्हे दाखल, (161) इसमांविरुद्ध कारवाई

SHARE:

दिनांक 1 ते 31 मे, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे.

 सदर मोहिमेच्या 11 व्या दिवशी नांदेड परिक्षेत्रात दिवसभरात गुटखा विक्रीच्या (3) कारवाया करण्यात आल्या असून, यातील आरोपीतांकडून 29,406/- रुपये किंमतीचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपींविरुद्ध कलम 123 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यास दहा वर्षाच्या कारावासासह द्रव्य दंडाची देखील शिक्षा आहे.

 त्याचबरोबर, मटका-जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या एकूण (49) इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (24) गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 5,13,070/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच, अवैध दारू विक्री करणाऱ्या (91) इसमांविरुद्ध (91) गुन्हे दाखल करून, त्यांच्याकडून 2,67,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त कारवाई सोबतच, शस्त्र अधिनियमान्वये (4), कोप्टा अन्वये (13), अशा एकूण (135) कारवाया करण्यात आल्या असून, यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून एकूण 8,22,446/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 खबर हेल्पलाइनला नागरिकांचा प्रतिसाद : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली खबरनावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइनला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now