लातूर: प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), लातूर मार्फत दि. ०६ आणि ०७ जून २०२६ रोजी रात्री विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत परराज्यात नोंदणी असलेल्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवासी बसेसवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ०६ व ०७ जून रोजी सायंकाळी ६:०० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९:०० वाजेपर्यंत (रात्र तपासणी दरम्यान) करण्यात आली. या मोहिमेमध्ये प्रामुख्याने परराज्यातील प्रवासी वाहनांद्वारे केली जाणारी करचुकवेगिरी, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘आत्पाकालीन दरवाजा’ (Emergency Exit) समोर अडथळे निर्माण करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
कारवाईची ठळक वैशिष्ट्ये:
एकूण तपासलेली वाहने: ७९ बसेस
दोषी आढळलेली वाहने: ०७ बसेस
वसूल केलेला एकूण दंड: ₹ १,०२,९२०/- (अक्षरी रुपये एक लाख दोन हजार नऊशे वीस मात्र)
जप्त केलेली वाहने: ०५ बसेस (सदर वाहने लातूर आणि अहमदपूर येथील एसटी डेपोमध्ये अटकावून ठेवण्यात आली आहेत).
मोहिमेतील सहभागी पथक:
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत वायुवेग पथकातील (Flying Squad) पुढील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते:
प्रमोद सरोदे, पृथ्वीराज गायकवाड, अंजली पाथरे, राहुल राठोड, सुनील गिते, श्रीराम क्षीरसागर, मकरंद जायभाये, राहुल देवगुंडे, पवन दरेकर, दिपाली जाधव, अश्विन सोनकांबळे, सुरेश माळी, सचिंद्रकुमार राठोड, शिवाजी सोनटक्के, किरण गोंधळे, सागर भोसले आणि अभिजीत रिळे.
भविष्यातही प्रवाशांची सुरक्षितता आणि शासकीय महसुलाचे नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारच्या तपासणी मोहीम भविष्यात देखील राबविण्यात येतील.




