दिनांक 07/06/2026 रोजी मिनी मार्केट येथे वाहतूक नियंत्रण शाखेतील अंमलदार पो.कॉ/820 शरद कांदे हे वाहतूक नियमानासाठी थांबले असता त्या ठिकाणी एका मोटरसायकल स्वारास चुकीच्या पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पडल्याचे क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
त्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री.अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लातूर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांना यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साळवे यांनी चौकशी अहवाल सादर केला असून त्यामध्ये पोलीस अंमलदार शरद कांदे यांनी कसुरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना तात्काळ निलंबन करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.




