मांजरा साखर कारखान्याकडून गळीत हंगाम 2025 -26 मध्ये गाळपास आलेल्या उसाला प्रति मेट्रिक टन रुपये 327.62 प्रमाणे अंतिम हप्त्याचे ऊस बिल खात्यावर जमा

SHARE:

गळीत हंगाम 2025 -26 साठी जाहीर केलेल्या ऊस दरापेक्षा जास्तीची एफ आर पी अदा
लातूर दि. १० राज्यातील सहकारी साखर कारखानदारीत मधील केवळ राज्य नाही तर देश पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या लातूर तालुक्यातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री श्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाला.
ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
मांजरा परिवरातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासाठी गळीत हंगाम 2025- 26 साठी सहकार महर्षी श्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी किमान एफ आर पी रुपये 3150 प्रति मॅट्रिक टन इतकी जाहीर केली होती, कारखान्याने यापूर्वी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना रुपये 2850/-प्रति मेट्रिक टन प्रमाणे ऊस बिल अदा केलेल आहे,ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना एफआरपी पैकी रुपये 327.62 प्रति मेट्रिक टन प्रमाणे अंतिम ऊस बिल कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री सहकार महर्षी श्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या आदेशाने दिनांक 10/06/ 2026 रोजी ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे. तसेच आपल्या संबंधित बँक शाखेची संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.
मांजरा परिवाराची परंपरा कायम
आदरणीय श्री दिलीपरावजी देशमुख साहेबांनी जाहीर केलेल्या किमान रुपये 3150 प्रति मॅट्रिक टन ऊस दरापेक्षा जास्तीचा ऊस दर रुपये 3177.62 प्रति मॅट्रिक टन इतका देऊन मांजरा परिवाराची परंपरा कायम राखली आहे. गळीत हंगाम 2025-26 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 227 कोटी 32 लाख 97 हजार 946 इतकी रक्कम मांजरा कारखान्याकडून वर्ग करण्यात आली आहे.
त्यामुळे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now