अवघ्या काही तासांत चोरीचा गुन्हा उघड!गांधी चौक पोलिसांची कारवाई; 45 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

SHARE:

गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेऊन चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे.
दि. 10 जून 2026 रोजी सायंकाळी 4.50 वाजण्याच्या सुमारास कापड लाईन परिसरातील एका मॅचिंग सेंटर येथे फिर्यादी ही आपल्या मुलीसह कपडे खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. खरेदीदरम्यान त्यांच्या पर्समध्ये ठेवलेली 45 हजार 500 रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. या घटनेनंतर गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 407/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. सुनिल रेजितवाड यांचे नेतृत्वात पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तपासणी, गोपनीय बातमीदार तसेच संशयितांची माहिती संकलित करून अत्यंत बारकाईने तपास करत विविध तांत्रिक बाबींचे विश्लेषण केले. त्याचबरोबर गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करून संशयितांचा शोध सुरू ठेवला.
या अथक प्रयत्नांना मुळे दि. 11 जून 2026 रोजी पोलिसांनी सापळा रचून

1) महेक आदिम शेख (वय 22 वर्षे, रा. खाडगाव रोड, लातूर)

2) रेश्मा मैनोद्दीन शेख (वय 23 वर्षे, रा. बौद्ध नगर, लातूर)

यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता संबंधित महिलांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील 45 हजार 500 रुपये चोरी केल्याची कबुली दिली.
कबुलीजबाबानंतर पोलिसांनी चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली असून गुन्ह्याचा उलगडा केला आहे.विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अत्यल्प कालावधीत तांत्रिक तपास, माहिती संकलन आणि नियोजनबद्ध कारवाईच्या बळावर पोलिसांनी आरोपींना जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरिराम सोनकांबळे करीत आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. सुनिल रेजितवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक हरिराम सोनकांबळे, महिला पोलीस उपनिरीक्षक बालिका निदाने, सहाय्यक फौजदार राजेंद्र टेकाळे, पोलीस हवालदार राम गवारे, संतोष गिरी, रविसन जाधव, नागनाथ नराळे, शिवराज भाडुळे, पोलीस नाईक सचिन चंद्रपाटले, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा शेळके, महिला पोलीस हवालदार सुमन कोरे आणि सुरेखा राठोड यांनी पार पाडली.

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now