घरफोडी गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत छडा.दोन सराईत आरोपी जेरबंद – चोरीचा मुद्देमाल व दुचाकीसह ₹१.३९ लाखांचा ऐवज जप्त.

SHARE:

लातूर जिल्ह्यात मालमत्ता संबंधी गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने कठोर, व परिणामकारक कारवाई करण्यात येत आहे. विशेषतः घरफोडी, चोरी व दरोड्यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आधुनिक तपास पद्धती, बातमीदार व तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी अत्यंत जलद व नियोजनबद्ध कारवाई करत घरफोडी गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावून दोन आरोपींना अटक केली आहे.
दिनांक २६/०३/२०२६ रोजी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर (स्थानिक गुन्हे शाखा, लातूर) यांचे नेतृत्वात संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींचा शोध घेण्यात येत होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना लातूर ते मुरुड जाणाऱ्या मुख्य मार्गावर रामेगाव पाटी येथे मोटारसायकलसह थांबलेल्या दोन इसमांना मध्यरात्री सुमारे ००.३० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे

1) अतुल चंद्रकांत आमले (वय ३० वर्षे) – रा. मुळशी, जि. पुणे.

2)रामेश्वर लिंबराज उपल्ले (वय २४ वर्षे) – रा. रायवाडी, ता. चाकूर, जि. लातूर
असे असल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यात सोने व चांदीचे दागिने मिळून आले. पुढील कसून चौकशीत आरोपींनी कबूल केले की,
लातूर शहरातील पोतदार स्कूल परिसरातील एका अपार्टमेंट मध्ये त्यांनी घरफोडी करून चोरी केली असून त्या संदर्भात पोलीस स्टेशन एमआयडीसी, लातूर गुरनं १५३/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.स. अंतर्गत गुन्हा दाखल आहे. कारवाईदरम्यान आरोपींकडून
सोन्याच्या चांदीचे दागिने किंमत ₹३९,८००/- वाहन मोटारसायकल (क्र. MH-24-BY-7951) किंमत : ₹१,००,०००/- एकूण ₹१,३९,८००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना पुढील कार्यवाही कामे पोलीस ठाणे एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, सिद्धेश्वर मदने,जमीर शेख, राहुल कांबळे, शैलेश सुडे महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाने सतर्कता, जलद प्रतिसाद व प्रभावी तपास कौशल्याने अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक केली आहे.

Leave a Comment

Follow Us Now