लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील काही महिन्यांपासून जनावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी व ग्रामीण नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जनावरे ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जात असल्याने अशा प्रकारच्या चोरीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस दलाने मालमत्ता संबंधी गुन्ह्यांविरोधात विशेष मोहीम राबवून गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण व तपास यावर विशेष भर दिला.
पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या सूचना व निर्देशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करत एका सराईत आरोपीस अटक करून जिल्हाभरातील अनेक जनावर चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
दिनांक २६ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथक मालमत्ता संबंधी गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत असताना अहमदपूर येथे गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. सदर कारवाईदरम्यान दुपारी २६ मार्च रोजी १५.०० वा. एक संशयित इसम ताब्यात घेण्यात त्या इसमाने आपली ओळख
इस्माईल दस्तगिर शेख (वय ४३ वर्षे, रा. किल्लारी, सध्या दापका, ता. निलंगा, जि. लातूर)
अशी दिली. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ₹४,१९,०००/- रोख रक्कम मिळून आली. सखोल चौकशीत आरोपीने कबूल केले की, तो मागील सुमारे एक वर्षापासून लातूर जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात म्हैस, गाय व वासरे चोरी करून त्यांची विक्री करत होता.तपासादरम्यान खालील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्याने केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.
१)पोलीस ठाणे लातूर ग्रामीण
गुरनं : ४२/२०२६कलम : ३०३(२) भा.न्या.सं. म्हैस चोरी
२)पोलीस ठाणे औसा गुरनं ६१/२०२६ कलम : ३०३(२) भा.न्या.सं.गाय व वासरू चोरी.
३) पोलीस ठाणे रेणापूर
गुरनं : ४२५/२०२५ कलम : ३०३(२) भा.न्या.सं. दोन म्हशी चोरी.
४) पोलीस ठाणे रेणापूर गुरनं ४२७/२०२५ कलम : ३०३(२) भा.न्या.सं. दोन म्हशी चोरी.
५) पोलीस ठाणे किल्लारी गुरनं : ३९/२०२५ कलम : ३०३(२), ३०५ भा.न्या.सं. दोन म्हशी व एक वासरू चोरी
६) पोलीस ठाणे देवणी गुरनं : २९६/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं. म्हैस चोरी
७)पोलीस ठाणे अहमदपूर गुरनं ५८०/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं. म्हैस व वासरू चोरी
८)पोलीस ठाणे निलंगा गुरनं : ९०/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं. म्हैस व वागर
चोरी चे गुन्हे उघडकीस आले असून जनावर चोरीतून मिळालेली रोख रक्कम ₹४,१९,०००/- नमूद आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे.
सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात सपोनि सदानंद भुजबळ, प्रवीण राठोड, माधव बिलापट्टे, रामलिंग शिंदे,नवनाथ हासबे, तुराब पठाण, मोहन सुरवसे, विजय पाटील, हिंगमिरे, श्रीनिवास जांभळे यांनी केली आहे.
लातूर जिल्ह्यात जनावर चोरीसारख्या मालमत्ता संबंधी गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असून अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.




