प्रतिबंधित गुटखा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ७.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपीवर गुन्हा दाखल.

SHARE:

लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी आळा घालणे, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गुन्ह्यांवर कठोर नियंत्रण ठेवणे तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठा, विक्री व वाहतुकीस पूर्णतः प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे शाखेमार्फत विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर (स्थानिक गुन्हे शाखा, लातूर) यांच्या नेतृत्वात दिनांक 02/04/2026 रोजी उशिरा रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून प्रतिबंधित गुटखा तस्करी करणाऱ्यावर कारवाई केली आहे.

सदर पथकाने दिनांक 02/04/2026 रोजी मध्यरात्री 00.15 वाजता पोलीस स्टेशन चाकूर हद्दीतील मोजे नळेगाव येथे जिल्हा परिषद शाळा पाठीमागे एक पांढऱ्या रंगाची Hyundai Accent कार (क्रमांक MH-24 AU 2984) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी आणण्यात येत असलेल्या वाहनास ताब्यात घेत असताना पोलिसांची चाहूल लागताच एक इसम अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, गाडीत असलेल्या दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या इसमांनी आपली नावे

1) सचिन विठ्ठलराव वडजे (वय 29 वर्षे)

2) अनिल नरहरी टोम्पे (वय 30 वर्षे)

दोघेही रा. नळेगाव, ता. चाकूर, जि. लातूर

तसेच पळून गेलेल्या इसमाचे नाव
3) शुभम मुकुंद शेलार (वय 30 वर्षे, रा. नळेगाव)
असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहनाची सखोल झडती घेतली असता गाडीच्या मागील सीटवर व डिग्गीत पांढऱ्या पोत्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विमल पान मसाला, V-1 तंबाखू तसेच सदर अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली Hyundai Accent कार असा एकूण ₹7,93,600/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी सचिन विठ्ठलराव वडजे, अनिल नरहरी टोम्पे, शुभम मुकुंद शेलार (फरार) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

सदर कारवाईत वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या यशस्वी कारवाईबद्दल संबंधित पथकाचे विशेष कौतुक करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध अशाच प्रकारच्या धडक व सातत्यपूर्ण कारवाया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापारावर कठोर कारवाई पुढेही सुरूच राहील, असा इशारा लातूर पोलीस कडून देण्यात आला आहे

Leave a Comment

Follow Us Now