लातूर:(प्रतिनिधी) मत्स्य व्यवसायासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहनिबंधक आणि कनिष्ठ लिपिकाला लातूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मा. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. आर. भोसले यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.काय आहे प्रकरण? यातील फिर्यादी यांचा मत्स्य व्यवसायाचा प्रस्ताव मंजूर करण्याचे काम प्रलंबित होते. हे काम करून देण्यासाठी आरोपी क्र. १ श्री. बालाजी विठ्ठलराव काळे (तत्कालीन सहनिबंधक, सहकारी संस्था, दुग्ध, वर्ग-२) यांनी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाचेची रक्कम आरोपी क्र. २ श्री. सुरेश राघोबा माळी (कनिष्ठ लिपिक, जिल्हा दुग्ध विकास कार्यालय) यांनी काळे यांच्या सांगण्यावरून स्वीकारली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांनी २०१२ मध्ये सापळा रचून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.न्यायालयाचा निकाल आणि शिक्षा:विशेष खटला क्रमांक १३/२०१४ मध्ये सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना खालील प्रमाणे शिक्षा सुनावली:आरोपी क्र. १ (बालाजी काळे): भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये: २ वर्षे ६ महिने साधा कारावास आणि १५,००० रुपये दंड. कलम १३(२) अन्वये: ३ वर्षे साधा कारावास आणि १०,००० रुपये दंड.आरोपी क्र. २ (सुरेश माळी):कलम १२ अन्वये: २ वर्षे साधा कारावास आणि ७,५०० रुपये दंड. तपास पथक या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. जे. आर. भंडारवार यांनी केला होता. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक शासकीय अभियोक्ता श्री. रमाकांत पी. चव्हाण पाखरसांगवीकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक जगदीश राऊत आणि कोर्ट अंमलदार पो. ह. भागवत कठारे यांनी सहकार्य केले.
लातूर: लाचखोर सहनिबंधक आणि लिपिकाला कारावासाची शिक्षा मत्स्य व्यवसायाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मागितली होती 5 हजारांची लाच.
The Sarfarosh News
FOLLOW US: