लातूर/प्रतिनिधी: लातूर महानगरपालिका, स्वच्छता विभागामार्फत दि.०५.०४.२०२६ पासून शहरातील मान्सूनपुर्व नाले सफाई मोहीम सुरू करण्यात आले असून शहरातील मोठे व छोटे नाले जे.सी.बी मार्फत काढून काढण्यात आलेला कचरा उचलून घेण्याची कार्यवाही चालू असून आजतागायत ४ मोठे नाले व २० छोटे नाले जेसीबी मार्फत काढून कचरा उचलण्यात आला आहे.तसेच आज दि.२३.०४.२०२६ रोजी मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांनी मान्सून पुर्व नाले सफाईच्या कामाची पाहणी प्रभाग क्रमांक ०४ मधील इस्लामपुरा झोपडपट्टी तसेच इस्लामपुरा काझी यांच्या शेतातील कच्चा नाला व रिंग रोड, सम्राट चौक, डि-मार्ट परीसराची पाहणी केली. पाहणी दरम्यान मान्सून पुर्व नाले सफाईच्या करावयाच्या उपाय योजनेबाबत संबंधीताना योग्य त्या सुचना देण्यात आल्या.
मान्सुनपुर्व नालेसफाई मोहीम
The Sarfarosh News
FOLLOW US: