लातूरच्या वृक्ष चळवळीचे जनक दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दुर्मिळ झाडांची देवराई’ साकारणार.

SHARE:

लातूर (प्रतिनिधी):लातूर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने वृक्ष चळवळ रुजवणारे संवेदनशील नेतृत्व,
सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य
साधून ‘विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा देवराई’ येथे शंभर दुर्मिळ झाडे
लावण्याच्या प्रकल्पाचा शानदार शुभारंभ करण्यात आला. औसा रोड येथील
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया समोरील परिसरात हा कार्यक्रम पार पडला.

आदरणीय दिलीपरावजी देशमुख यांनी १९९३ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असताना
लातूर शहरात वृक्षारोपणाची मोठी मोहीम हाती घेतली होती. “भारत माँ की एक
पुकार, बच्चे कम हो पेड हजार” हे त्यांनी दिलेले घोषवाक्य आजही
लातूरकरांच्या स्मरणात आहे. जुना जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा
परिषद ते हरंगुळ रेल्वे स्टेशनपर्यंत लावलेली पिंपळाची हजारो झाडे आणि
तहसील कार्यालय, सरस्वती कॉलनी परिसरातील २०० हून अधिक ‘आकाश मोगरा’
(बूच) झाडे आजही साहेबांच्या निसर्गप्रेमाची साक्ष देत आहेत.

साहेबांच्या कल्पनेतून जिल्हा परिषद परिसरात अवघ्या पाच-सहा फुटांच्या
अंतरावर लावलेली शेकडो आकाश मोगऱ्याची झाडे आजही लातूरमध्ये एखाद्या हिल
स्टेशनवर असल्याचा अनुभव देतात. जिल्हा क्रीडा संकुल, नाना-नानी पार्क
आणि एस. आर. देशमुख नगराध्यक्ष असताना शहरात लावलेली विविध झाडे ही
दिलीपरावजींच्या दूरदृष्टीचे फळ आहे. साहेबांच्या या आवडीचा सन्मान करत
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्मिळ वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात
आला.

मांजरा देवराई येथे यापूर्वी ६००० हून अधिक झाडे यशस्वीपणे जतन करण्यात
आली आहेत. आता याच ठिकाणी दुर्मिळ झाडांचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या
उपक्रमात लातूर वृक्ष चळवळ, सह्याद्री देवराई, चैतन्य हास्य मंडळ,
ज्येष्ठ नागरिक संघ आणि सनराईज सामाजिक संस्था यांचे प्रतिनिधी मोठ्या
संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी सह्याद्री देवराई व लातूर वृक्ष चळवळीचे समन्वयक सुपर्ण जगताप,
ॲड. कालिदासराव देशपांडे, आर्किटेक्ट कृष्णकुमार बांगड, प्रकाश गादगीने,
प्रभाकर जाधव, डॉ. दशरथ भिसे, भीम दुनगावे, स्नेहा निकम, संतोष पोतले,
कैलास पंडित, आशिष देशमुख, महादेव गिरी, पंढरीनाथ नागिमे, बाळासाहेब
मारवने, मानकर सर, अमृत सोनवणे, दीपक मंदाडे, रितेश चापसी, ॲड. सुनील
गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व निसर्गप्रेमी
उपस्थित होते.

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now