लायन्स क्लबतर्फे ज्येष्ठ पत्रकार शशिकांत पाटील यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव. २२ वर्षांच्या निर्भीड पत्रकारितेची दखल; मान्यवरांकडून कार्याचा गौरव

SHARE:

लातूर : लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सन्मान कर्तृत्वाचा’ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात News 18 मराठी तसेच आकाशवाणीचे पत्रकार शशिकांत पाटील यांचा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने गौरव करण्यात आला.

लातूर येथे झालेल्या या भव्य सोहळ्यास जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, विलास बडे, नागनाथ गित्ते, ॲड. योगेश शिंदे तसेच ईश्वर चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विलास बडे यांनी शशिकांत पाटील यांनी गेल्या २३ वर्षांपासून केलेल्या निर्भीड आणि अभ्यासपूर्ण पत्रकारितेचे विशेष कौतुक केले. समाजातील विविध प्रश्न प्रभावीपणे मांडत पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल त्यांनी पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनीही News 18 मराठी आणि आकाशवाणीचे पत्रकार शशिकांत पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यास शशिकांत पाटील यांच्या परिवारातील सौ. सरस्वती पाटील, कु. आरोही आणि कु. माही यांची उपस्थिती होती. पुरस्कार स्वीकारताना उपस्थित मान्यवरांनी आणि रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा गौरव केला.

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now