जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या हस्ते संजय राजुळे यांचा राज्यस्तरीय गौरव.

SHARE:

लातूर (प्रतिनिधी)ः लातूर येथील दयानंद सभागृहात दिनांक 23 मे 2026 रोजी लॉयन्स क्लब ऑफ लातूर सिटी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय राजुळे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. समाजासाठी सातत्याने आणि निस्वार्थ भावनेने करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच न्यूज 18 लोकमतचे सहसंपादक विलास बडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक, डॉक्टर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री.संजय राजुळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, आरोग्य आणि जनजागृती क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून त्यांनी आपले आरोग्य आपली जबाबदारी या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभर आरोग्य जनजागृतीचे व्यापक कार्य सुरू केले आहे. या अभियानांतर्गत त्यांनी व्यसनमुक्ती जनजागृती, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरजू रुग्णांना मदत, विशेषतः कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक व मानसिक आधार देणे, जैविक शेतीचा प्रसार, वृक्षलागवड, स्वच्छता मोहीम तसेच अनाथ, गरजू आणि दिव्यांग मुलांना मदत असे विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
त्यांच्या कार्यामुळे अनेक नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मोठी मदत झाली आहे. विशेषतः युवकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संदेश देत निरोगी आणि सशक्त समाज घडविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. सन्मान कर्तृत्वाचा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने आपले आरोग्य आपली जबाबदारी परिवारासह त्यांच्या सहकार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हा क्षण संपूर्ण परिवारासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री. संजय राजुळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई

Follow Us Now