पोलीस स्टेशन रेणापूर येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार विश्वास जाधव हे काल दि. १२.०६.२०२६ रोजी आपले दैनदीन कर्तव्य पार पाडून रात्री 09.30 वाजताचे सुमारास रेणापूरकडून लातूरकडे मोटर सायकल MH 20 N 720 ने जात असताना पाठीमागून येणाऱ्या टाटा इंडीका MH 12 HV 7633 गाडीने जोराची धडक दिल्याने रोडवरती पडून किरकोळ जखमी झालेले आहेत. सदर अपघातामध्ये त्यांच्या कोपराला किरकोळ जखम झालेली आहे. त्यांनी हेलमेट परीधान केल्यामुळे त्यांच्या डोक्याला कुठलीही जखम झाली नाही व ते या जीवघेण्या अपघातातून वाचलेले आहेत.
लातूर पोलीस दलाकडून सर्व मोटार सायकलवरील प्रवाशांनी हेलमेटचा वापर करावा म्हणून सतत जगजागृती, कायदयाची अमलबजावणी इत्यादी सर्वेत्तपरी प्रयत्न सातत्याने केले जात आहे. हेलमेटचा वापर जास्त पर्यायाने 100 टक्के व्हावा या करीता पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये रक्तदान शिबाराचे आयोजन करून रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला हेलमेट भेट दिलेले आहे.
महत्वाचे म्हणजे हेलमेट वापराच्या सक्तीबाबत सुचना देत असताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूर जिल्यातील सर्व प्रभारी अधीकारी यांना त्यांच्या अधीनस्थ असलेल्या प्रत्येक पोलीस अमलदार यांनी हेलमेट वापरले पाहीजे नाही वापरल्यास त्यांना शिक्षा देवून त्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तकामध्ये घेतली जाईल अशा सुचना देवून पोलीस निरीक्षक वहातूक शाखा यांना त्याची सुरूवात पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर या ठिकाणावरून करण्यास बजावलेले होते.
या सर्व बाबींचा परीणाम हेलमेट वापरावर झाला असून सर्व पोलीस अमलदार जास्तीत जास्त हेलमेटचा वापर करत आहेत. त्यामुळेच कालच्या झालेल्या अपघातात केवळ हेलमेटमुळे एका कर्तव्यदक्ष पोलीस अमलदाराच जिव वाचलेला आहे पर्यायाने एका कुटुंबाचे रक्षण झालेले आहे.



