विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 26 मार्च रोजी बंद राहणार

SHARE:

लातूर, दि. 24 : श्रीराम नवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग गुरुवार, 26 मार्च, 2026 रोजी बंद राहील. तसेच शुक्रवार, 27 मार्च, 2026 पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील.

Leave a Comment

Follow Us Now