अहमदपूर येथे मटका व ऑनलाईन लॉटरी जुगाराविरोधात विशेष पथकाची कारवाई.

SHARE:

एकाच दिवशी सलग 3 छापे – 3 आरोपींवर गुन्हे दाखल,₹1,05,560/- चा मुद्देमाल जप्त.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        लातूर जिल्ह्यात अवैध जुगार, मटका व ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाद्वारे सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक 24/03/2026 रोजी अहमदपूर शहरात गुप्त माहितीच्या आधारे नियोजनबद्ध कारवाई करत मटका व ऑनलाईन लॉटरी जुगार चालविणाऱ्या ठिकाणांवर सलग छापेमारी करण्यात आली.सदर कारवाईदरम्यान भाजी मार्केट, मारोती मंदिर परिसर तसेच मटन मार्केट परिसरात लक्ष केंद्रीत करून तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकण्यात आली. या वेळी आरोपी हे लोकांकडून पैसे स्वीकारून मोबाईल व संगणकाच्या सहाय्याने “मिलन डे”, “Play Game” व “Fun Target” अशा विविध नावांनी मटका व ऑनलाईन लॉटरी जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले.

अटक करण्यात आलेले आरोपी.

1)सुरज हिरालाल राउत्रे (वय 32 वर्षे, रा. गवळी गल्ली, अहमदपूर)

2)गोपीचंद राजकुमार भगत (वय 32 वर्षे, रा. महेबूब नगर, अहमदपूर)

3)सुनिल रामराव गायकवाड (वय 34 वर्षे, रा. बोरी ता. जिंतूर जि. परभणी, सध्या अहमदपूर)

असे असून एकूण तीन प्रकारच्या मटका जुगार आवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये

1) मटका जुगार
भाजी मार्केट परिसरात आरोपी सुरज राउत्रे हा मोबाईलच्या सहाय्याने “मिलन डे” नावाचा मटका जुगार चालवत असताना आढळून आला. त्याच्याकडून मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ₹25,000/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.

2) ऑनलाईन लॉटरी (Play Game)
एका कॉम्प्लेक्समधील दुकानात आरोपी गोपीचंद भगत हा संगणकाच्या सहाय्याने “Play Game” नावाची ऑनलाईन लॉटरी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत संगणक साहित्य व रोख रक्कम असा ₹53,830/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.

3) ऑनलाईन लॉटरी (Fun Target)
मटन मार्केट शेजारील नगरपालिकेच्या दुकानात आरोपी सुनिल गायकवाड हा “Fun Target” नावाचा ऑनलाईन लॉटरी जुगार चालवत असताना मिळून आला. त्याच्याकडून एलईडी टीव्ही, संगणक साहित्य व रोख रक्कम असा ₹26,730/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अशाप्रकारे एकूण तीन्ही कारवायांमध्ये एकत्रित ₹1,05,560/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) तसेच महाराष्ट्र राज्य लॉटरी अधिनियम कलम 4 (अ) (ग) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने, अचूक माहितीचे विश्लेषण करून व योग्य वेळ साधत करण्यात आली असून सदर पथकात पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख,पोलीस अंमलदार उत्तम जाधव, रामहरी भोसले, विशाल गुंडरे, यशवंत घुगे, दीपक वैष्णव यांचा समावेश होता.

Leave a Comment

Follow Us Now