एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्योजकता जागरूकता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

SHARE:

लातूर : येथील एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडो जर्मन टूल रूम,छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता जागरूकता  या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. श्री सुरज चंचलानी,डायरेक्टर सीबीएफसी लिमिटेड यांनी विद्यार्थ्यांना या विषयावर मार्गदर्शन केले तसेच शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली ज्यामुळे  हे सत्र विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरले. तसेच विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या संधी शोधण्यासाठी मोलाचे ज्ञान आणि प्रेरणा मिळाली.

या कार्यशाळेत अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.श्रीकांत नागुरे,डॉ. ओमप्रकाश शिवपुजे,श्री संतोष सांगवे तसेच समन्वयक प्रा.राहुल व्यवहारे, प्रा. सुरज बिराजदार यांनी सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
या कार्यशाळेच्या  यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. आदिनाथ सांगवे, उपाध्यक्ष श्री. माधवराव पाटील चिंचोलीकर, सचिव श्री. माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव श्री. सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष श्री. विजय रेवडकर, कार्यकारी संचालक श्री. प्रदीप दिंडेगावे, संचालक श्री. राजेश्वर बुके, श्री. बसवराज येरटे, श्री.एड. काशिनाथ साखरे, सौ. ललिताताई पांढरे, श्री. महेश हलगे, श्री. बाबुराव तरगुडे व श्री. गुरुलिंग धाराशिवे यांनी संबंधित प्राध्यापकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. मोहन बुके, प्राचार्य डॉ. शेखर जगदे, उपप्राचार्य वीरभद्र बाळे तसेच निबंधक डॉ. सौ. ज्योती पाटील यांनीही या उपक्रमाचे व संबंधित प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

Follow Us Now