लातूर, दि. ०१ : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ व ८८ अन्वये संस्थांच्या चौकशीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नामतालिका तयार करण्यात येणार असून, यासाठी सहकार विभागातील ७० वर्षांखालील निवृत्त अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, वकील आणि सनदी लेखापाल यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिली आहे.या प्रक्रियेसाठीचे विहित अर्ज १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत विभागीय सहनिबंधक कार्यालय लातूर, तसेच लातूर, धाराशिव, बीड व नांदेड येथील जिल्हा उपनिबंधक आणि सर्व सहायक निबंधक कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील. इच्छुकांनी पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह याच मुदतीत संबंधित कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सहकारी संस्थांच्या चौकशीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या नामतालिकेसाठी ३० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
The Sarfarosh News
FOLLOW US: