हिंगोली जिल्ह्यात आज दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०८:४५:२३ वाजता रिश्टर स्केलवर ४.७ तीव्रतेचा (हलका ते मध्यम स्वरूपाचा) भूकंप झाल्याची नोंद झाली आहे

SHARE:

दि. ११ एप्रिल २०२६

तीव्रता: ४.७
वेळ: सकाळी ०८:४५:२३ वा.
स्थान निर्देशांक: १९.५३३ उत्तर अक्षांश, ७७.२०२ पूर्व रेखांश
खोली: १० कि.मी.
परिसर: हिंगोली, महाराष्ट्र

सदर भूकंपामुळे लातूर जिल्ह्यात कोणतीही हानी अथवा परिणाम झाल्याचे तत्काळ अहवाल प्राप्त झालेले नाहीत. ही माहिती केवळ नागरिकांच्या माहितीसाठी देण्यात येत आहे.

तथापि, नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून खालील सूचनांचे पालन करावे:

भूकंपाच्या वेळी व नंतर घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना:

1. भूकंपाच्या वेळी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
2. इमारतीत असल्यास टेबल, पलंग किंवा मजबूत फर्निचरखाली आसरा घ्यावा (Drop, Cover, Hold).
3. खिडक्या, काच व जड वस्तूंपासून दूर राहावे.
4. लिफ्टचा वापर टाळावा; शक्य असल्यास जिन्याचा वापर करावा.
5. मोकळ्या जागेत असल्यास इमारती, झाडे व वीज तारा यापासून दूर राहावे.
6. भूकंपानंतर इमारतींमध्ये तडे किंवा नुकसान दिसल्यास त्वरित प्रशासनास कळवावे.
7. अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये.
8. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन घटना आढळल्यास तात्काळ कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

— जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, लातूर

Leave a Comment

Follow Us Now