पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैशांच्या वादातून झालेल्या खुनाच्या प्रयत्नातील (Attempt to Murder) तीन सराईत आरोपींना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. आरोपींनी उसन्या पैशांच्या कारणावरून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला होता.दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी स्वारगेट येथील धोबीघाट भागात उसन्या पैशांच्या मागणीवरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत होऊन आरोपींनी संबंधित व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११५ (१), ३५१ (१), ३५२, १८९ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार सद्दाम तांबोळी आणि अजीम शेख यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी मार्केटयार्ड व बिबवेवाडी परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले: १. रेहान ऊर्फ खिमा फिरोज शेख (वय २०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) २. गौरव गणेश गुजर (वय २०, रा. काशेवाडी, भवानी पेठ)तसेच, या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अतिक हारुण अतार (वय २१, रा. काशेवाडी, भवानी पेठ) हा फरार होता. तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीने त्याला १० एप्रिल २०२६ रोजी भवानी पेठ परिसरातून जेरबंद करण्यात आले.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त श्री. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त श्री. निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे-१) श्री. शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ च्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ आणि त्यांच्या पथकाने केली.पथकातील सदस्य: सद्दाम तांबोळी, अजीम शेख, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, नागनाथ राख, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विशाल दळवी, विनोद चव्हाण, संजय सरगर, संतोष टकले, ऋषिकेश व्यवहारे, शिवानंद कायगुडे, विजयकुमार पवार, संदीप शिर्के, ओमकार कुंभार, संजय आबनावे व विनायक वगारे.



