लातूर : शहरातील राजीव गांधी चौक परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देत आवश्यक निधीची तरतूद करावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक १८ चे नगरसेवक अनंत गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.लातूर शहरातील अनेक भागांत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, जागेअभावी राजीव गांधी चौक परिसरात अद्याप स्वच्छतागृह उभारणी होऊ शकलेली नाही. या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता ही मागणी करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.शुक्रवार, दि. १८ रोजी पालकमंत्र्यांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात, संबंधित ठिकाणी तातडीने जागा निश्चित करून स्वच्छतागृह उभारणीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या निवेदनाची तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविल्याची माहिती नगरसेवक अनंत गायकवाड यांनी दिली. लवकरच राजीव गांधी चौक परिसरात स्वच्छतागृह उभारणीचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
राजीव गांधी चौकात सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी जागा व निधी द्यावा पालकमंत्र्यांकडे नगरसेवक अनंत गायकवाड यांची मागणी.
The Sarfarosh News
FOLLOW US: