लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत असणाऱ्या १६ शाळातील ९६५ विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी दिले होते.
त्यानुसार आज सदरील स्पोर्ट ड्रेस चे वाटप उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्या हस्ते करण्यात आले.मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे सुविधा मिळाव्या असा पालिकेचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने हे स्पोर्ट ड्रेस वाटप करण्यात आले.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.यावेळी सहाय्यक आयुक्त निर्मला माने,शिक्षणाधिकारी साहेबराव जाधव, भांडारपाल बालाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
