Karnataka two guards shot in robbery at bidar atm : कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात शिवाजी चौकात गुरुवारी भरदिवसा दरोडा पडला. या घटनेत दरोडेखोरांनी दोन सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. सुरक्षारक्षक एटीएममध्ये 93 लाख रुपये भरण्याच्या तयारीत असतानाच दरोडेखोरांनी लूट केली.
दरोडेखोरांच्या गोळीबारात गिरी व्यंकटेश आणि शिवा काशिनाथ हे दोघे मृत झाले आहेत. दोघेही एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करणाऱ्या सीएमएस एजन्सीचे कर्मचारी होते. पोलिसांनी सांगितले की, दुचाकीस्वार दरोडेखोरांनी आठ राऊंड गोळीबार करून दोन्ही सुरक्षारक्षक जागीच ठार केले.
दरोडा कधी पडला?
दरोड्याची घटना 16 जानेवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. गोळीबारानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 93 लाखांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
दरोड्याच्या प्लॅनिंग संशयितांना अटक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर संपूर्ण परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे तसेच गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.
दरम्यान, पोलिस पुरावे गोळा करत आहेत, पोलिस जवळपास लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करत आहेत. इतर पुरावेही लक्षात घेऊन तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही याप्रकरणी अटक झाली नसली तरी लवकरच गुन्हेगारांना पकडण्यात यश येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर शिवाजी चौक व परिसरात भीतीचे व घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी स्थानिक लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित तक्रार करा.
