The Sarfarosh News

महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल; लातूर आणि सांगलीचा अटकेत.

प्रयागराज/अहमदाबाद : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये गंगा स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करणाऱ्या तीन युट्युबर्सना अटक केली असून, यामधील दोघेजण महाराष्ट्रातील आहेत.

अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली आहे. अहमदाबाद सायबर क्राईमच्या डीसीपी लविना सिन्हा यांनी सांगितले की, या तिघांनी महाकुंभात आंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ इतर युट्युब चॅनेलनाही विकले होते. आरोपींनी देशातील 60-70 रुग्णालयांचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केल्याचाही संशय आहे. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फूलचंद, महाराष्ट्रातील लातूर येथील प्रज्वल अशोक तेली आणि सांगली येथील प्रज राजेंद्र पाटील अशी आरोपींची नावे आहेत.

तिन्ही आरोपी युट्युब आणि टेलिग्रामवर चॅनेलवर महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या महिलांच्या व्हिडीओच्या विक्रीतून पैसे मिळवत होते. राजकोट येथील पायल हॉस्पिटलचा सीसीटीव्ही आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून हॅक करण्यात होते. हे कृत्य देखील याच टोळीचे असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. अहमदाबाद गुन्हे शाखेने महाराष्ट्रातून प्रज्वल अशोक तेली आणि प्रज राजेंद्र पाटील यांना अटक केली. दरम्यान, चंद्रप्रकाश फूलचंद यांना प्रयागराज येथून अटक करण्यात आली. आरोपींची अजूनही चौकशी सुरू आहे. प्रयागराज येथून अटक करण्यात आलेल्या आरोपी चंद्रप्रकाश फूलचंदच्या चॅनलवर महाकुंभमेळ्याचे व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते. आता त्याने हा व्हिडिओ स्वतः अपलोड केला आहे की कोणाकडून खरेदी केला आहे याची चौकशी केली जात आहे.

Leave a Comment

Read More